Posts

लोकशाही आणि भांडवलशाहीच्या विळख्यातून

  आज सकाळी कॉल आला तुमचं काय मत आहे कोण जिंकेल ?  खूप गुंतागुंती आहे नाही सांगता येणार मॅडम .    तुम्ही कोणाला मत देणार असं स्पष्ट विचारल तेव्हा मी जरा थांबून म्हंटलं मत गोपनीय ठेवायचा हक्क आहे ना लोकशाहीत . त्यावर मॅडम म्हणाली सर आम्ही   डेटा कलेक्ट करतोय   .... मी म्हंटलं तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्या . कॉल   संपला ... माझं मत मतदान आणि एकंदर लोकशाही बद्दल एखाद्या आर्ट फिल्म च्या हिरो सारखे आहे  , जे सहसा लोंकाना पटत   नाही . त्यामुळेच   मी या विषयावर मौन राहणं   उत्तम समजतो .  ‘लोकशाही’ आणि ‘ भांडवलशाही’ या दोन्ही संकल्पना मुळातच परस्परविरोधी आहेत .  अफाट जनसंख्या असणाऱ्या देशात लोकशाही नापास होते किंवा भांडवलशाहीच्या मुखवट्यात आपले तोंड लपवण्यास लाचार होते .  भांडवलशाह नफेखोरी   करताना लोकशाहीची मूलभूत तत्व कित्येकदा विसरतात . ' समता ' (equality) आणि पारदर्शकता (transparency) ही लोकशाहीची दोन मूलभूत त...
Recent posts