Toxic, Narcissist आणि Personality Disorder: आपण माणसांना समजून घेतोय की फक्त त्यांना Label लावतोय? काल सहज बाहेर पडलो आणि एका नवीन चित्रपटाचं poster दिसलं Toxic . शब्द नजरेत पडला आणि अचानक मला एक वेगळाच प्रश्न पडला : हा शब्द English भाषेत आला तरी कुठून? Toxic हा मुळात काही psychology मधून जन्माला आलेला शब्द नाही. त्याचा संबंध toxicity, toxic substance, poison, intoxication अशा वैद्यकीय आणि रासायनिक संदर्भांशी आहे. म्हणजे एखादा पदार्थ शरीराला विषारी ठरतो, शरीरात विषारी परिणाम निर्माण करतो, त्याला toxic म्हणता येतं. पण मग हळूहळू भाषेने एक मोठी उडी घेतली. आता toxic हा पदार्थासाठी कमी आणि माणसांसाठी जास्त वापरला जाऊ लागला. एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही toxic . एखादा मित्र आपल्याला विरोध करतो toxic . एखाद्या नात्यात मतभेद झाले toxic relationship . एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही toxic person . आणि सर्वात मजेशीर भाग म्हणजे आपण हा निष्कर्ष इतक्या conviction ने सांगतो की जणू त्या व्यक्तीची laboratory test करूनच आलो आहोत. "तो माणूस toxic आहे." कशावरून? "कार...
आज सकाळी कॉल आला तुमचं काय मत आहे कोण जिंकेल ? खूप गुंतागुंती आहे नाही सांगता येणार मॅडम . तुम्ही कोणाला मत देणार असं स्पष्ट विचारल तेव्हा मी जरा थांबून म्हंटलं मत गोपनीय ठेवायचा हक्क आहे ना लोकशाहीत . त्यावर मॅडम म्हणाली सर आम्ही डेटा कलेक्ट करतोय .... मी म्हंटलं तुम्हाला तुमच्या कामासाठी शुभेच्या . कॉल संपला ... माझं मत मतदान आणि एकंदर लोकशाही बद्दल एखाद्या आर्ट फिल्म च्या हिरो सारखे आहे , जे सहसा लोंकाना पटत नाही . त्यामुळेच मी या विषयावर मौन राहणं उत्तम समजतो . ‘लोकशाही’ आणि ‘ भांडवलशाही’ या दोन्ही संकल्पना मुळातच परस्परविरोधी आहेत . अफाट जनसंख्या असणाऱ्या देशात लोकशाही नापास होते किंवा भांडवलशाहीच्या मुखवट्यात आपले तोंड लपवण्यास लाचार होते . भांडवलशाह नफेखोरी करताना लोकशाहीची मूलभूत तत्व कित्येकदा विसरतात . ' समता ' (equality) आणि पारदर्शकता (transparency) ही लोकशाहीची दोन मूलभूत त...